धरत्रीले दंडवत

काया काया शेतामधी 
घाम घाम जिरव 
तव्हा उगलं उगलं 
कायामधून हिरवं 

येता पिकाले बहर 
शेताशेतात हिरवय 
कसं पिकलं रे सोनं 
हिर्व्यामधून पिवयं

अशी धरीत्रीची  माया
अरे तिला नाही सीमा 
दुनियाचे सर्वे पोट 
तिच्यामधी झाले जमा 

शेतामधी भाऊराया 
आला पीक गोंजारत 
हात जोडीसानी केला 
धरीत्रिले दंडवत 

शेतामधी भाऊराया 
खाले वाकला वाकला 
त्यानं आपल्या कपायी 
टिया मातीचा लावला 

अशी भाग्यवंत माय 
भाउरायाची जमीन 
वाडवडीलांचं देवा 
राखी ठेवा रे वतन 
 

13 comments:

  1. 2004 ला चौथ्या वर्गात mab ही कविता होती

    ReplyDelete
  2. आज हि कविता आठवली की जणू नकळत सोबत च्या सर्व विद्यार्थी मित्रांचा आवाज कानावर येतो ते दिवस स्पष्ट आठवतात एका तालात आणि सुरत आम्ही इयत्ता चॉथी(४) ला हि कविता खुप आवडीने म्हणायचो!!

    ReplyDelete
  3. बालपणाची एक आठवण कवीता हा आमचा जणु एक छंदच आज ही कविता गातो आम्ही..

    ReplyDelete
  4. अप्रतिम रचना

    ReplyDelete
  5. खूप छान आहे हि कविता

    ReplyDelete
  6. अप्रतिम अशी, मनाला भिडणारी.. कविता.

    ReplyDelete