मानूस मानूस,
मतलबी रे मानसा
तुले फार हाव,
तुझी हाकाकेल आशा.
मानसा मानसा,
तुझी नियत बेकार
तुझ्याहून बरं,
गोठ्यातलं जनावर.
भरला डाडोर,
भूलीसनी जातो सूद
खाइसनि चारा,
गायम्हैस देते दूध.
मतलबासाठी,
मान मानूस डोलाये
इमानाच्यासाठी,
कुत्रा शेपूट हालाये.
मानसा मानसा,
कधी होशील मानूस
लोभासाठी झाला,
मानसाचा रे कानूस!
बहिणाबाईंच्या कवितांचा तुमच्या कडे असलेला संग्रह इतरांसाठी खुला केला त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद. हा अतिशय स्तुत्य प्रकल्प आहे. आपणास हार्दिक शुभेच्छा!!
ReplyDeleteधन्यवाद.
Delete